वसईत आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 21:32 IST2017-02-07T21:32:25+5:302017-02-07T21:32:25+5:30
एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून तिच्यावर गेल्या तीन वर्षांपासून सामूहिक बलात्कार

वसईत आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 7 - एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून तिच्यावर गेल्या तीन वर्षांपासून सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.
पीडित तरुणी अल्पवयीन असून, वसईत राहते. २०१४ मध्ये तिचे योगेश सुतार (24) या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. एकदा प्रियकर योगेश सुतार पीडित तरुणीला एव्हरशाईन येथील मित्राच्या घरी घेऊन आला होता. तिथे त्या मुलीची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर तिच्या प्रियकराच्या मित्रांनी या चित्रफितींना सार्वजनिक करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली होती.
तीन वर्षे सहा आरोपी या मुलीचे लैंगिक शोषण करत होते. अखेर या तरुणीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माणिकपूर पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत योगेशसह आशिष पाचलकर (19), स्वप्नील मालकारी (23), सुहास सुतार (23), सागर गुरडा (22) या आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.