मोर्चासाठी मराठा युवकांमध्ये तलवार कट ‘मिशी'ची क्रेझ
By Admin | Updated: September 14, 2016 11:36 IST2016-09-14T11:36:53+5:302016-09-14T11:36:53+5:30
२६ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा मोर्चाच्या निमित्ताने मिशी वाढविण्याचे फॅड जिल्ह्यातील मराठा तरूणांमध्ये आले आहे.

मोर्चासाठी मराठा युवकांमध्ये तलवार कट ‘मिशी'ची क्रेझ
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १४ - २६ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा मोर्चाच्या निमित्ताने मिशी वाढविण्याचे फॅड जिल्ह्यातील मराठा तरूणांमध्ये आले आहे. अनेक तरूण मिशी वाढवित तिला ‘तलवार कट’ चा आकार देत असल्याचे चित्र निदर्शनास पडत आहे.
२६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाने एकत्रित होवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याकरिता गावापासून तर जिल्हा पातळीपर्यंत विविध मार्गाने आयोजनसभा पडत आहे. या मोर्चात प्रत्येक जण आपआपल्या परीने सहभाग देत आहे. तसेच या मोर्चात सहभागी होण्याकरिता काळ्या रंगाच्या टी शर्ट तयार करण्यात आल्या असून, या टी शर्टहीची जोरात विक्री सुरू आहे. या मोर्चात अनेक तरूण कोपर्डी घटनेचा निषेध करण्याकरिता काळ्या रंगाची टी शर्ट घालणार आहे.
तसेच अनेक तरूण मिशी वाढवून मोर्चात सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात मोर्चाची तयारी सुरू असून, गावा गावात रथाव्दारे तसेच दुचाकी रॅली काढून प्रचार प्रसार करण्यात येत आहे.