शहीद जवानांचे पार्थिव अकोल्यात पोहोचले!

By Admin | Updated: February 1, 2017 05:33 IST2017-02-01T04:20:13+5:302017-02-01T05:33:04+5:30

काश्मीरमधील गुरेचा येथे हिमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्य़ातील दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास लष्कराच्या विशेष

The martyr's soldiers reached Akola! | शहीद जवानांचे पार्थिव अकोल्यात पोहोचले!

शहीद जवानांचे पार्थिव अकोल्यात पोहोचले!

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 01 - काश्मीरमधील गुरेचा येथे हिमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्य़ातील दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास लष्कराच्या विशेष गाडीमधून अकोला येथे आणण्यात आले. यावेळी लष्कराचा ताफा सोबत होता. लष्करात कार्यरत असताना अकोला येथील आनंद गवई आणि मूर्तीजापूर तालुक्यातील माना येथील संजय खंडारे हे काश्मीर येथे हिमस्खलन होऊन शहीद झाले.

दरम्यान, रात्री 2.30 वाजता त्यांचे पार्थिव सर्वोपचारमध्ये वातानुकूलित शव पेटीत ठेवण्यात आले आहे. गीता नगर येथील स्मशानभूमीत सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात शहीद आनंद गवई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर शहीद संजय खंडारे यांच्या पार्थिवावर माना तालुका मुर्तीमूर्तीजापूरमध्ये सकाळी 10.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: The martyr's soldiers reached Akola!