सालेमशी लग्न लावून द्या अन्यथा जीव देईन, तरुणीची धमकी
By Admin | Updated: June 29, 2015 11:00 IST2015-06-29T11:00:19+5:302015-06-29T11:00:30+5:30
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील २५ वर्षीय तरुणीने कुख्यात डॉन अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी टाडा कोर्टाकडे मागितली असून लग्न झाले नाही तर मी जीव देईन अशी धमकीच या तरुणीने दिली आहे.

सालेमशी लग्न लावून द्या अन्यथा जीव देईन, तरुणीची धमकी
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ - ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील २५ वर्षीय तरुणीने कुख्यात डॉन अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी टाडा कोर्टाकडे मागितली असून लग्न झाले नाही तर मी जीव देईन अशी धमकीच या तरुणीने दिली आहे. पोलिसांनी अबू सालेमशी नाव जोडल्याने नाईलाजास्त त्याच्याशी लग्न करावे लागले असा दावाही या तरुणीने केली आहे.
सध्या तळोजा कारागृहात असलेल्या अबू सालेमने काही महिन्यांपूर्वी धावत्या ट्रेनमध्येच एका तरुणीशी निकाह केल्याचे वृत्त आले होते. ही तरुणी मुंब्य्रातील असून निकाहासंदर्भात औपचारिक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी अबू सालेमला मुंबई कोर्टात आणावे अशी विनंती तिने टाडा कोर्टाकडे केली आहे. अबू सालेमसोबतच्या निकाहाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर जीव देईन अशी धमकीही तिने दिली आहे. अबू सालेमसोबतच्या निकाहाचे खापरही तिने पोलिसांवरच फोडले. पोलिसांनी अबू सालेम व माझे बोगस छायाचित्र तयार करुन ते जगजाहीर केले, यामुळे माझी मित्रमंडळी, नातेवाईक माझ्यापासून दुरावली, मग अशा स्थितीत माझ्याशी लग्न कोण करणार असा सवालही तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता अबू सालेमसोबतच निकाह लावून द्यावे अशी तिची मागणी आहे.