छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: June 6, 2016 23:58 IST2016-06-06T23:54:31+5:302016-06-06T23:58:02+5:30

बर्दापूर : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री बर्दापूर तांडा (ता. अंबाजोगाई) येथे घडली.

Married wife commits suicide | छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बर्दापूर : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री बर्दापूर तांडा (ता. अंबाजोगाई) येथे घडली.
वैशाली भाऊसाहेब जाधव (२७ रा. बर्दापूर तांडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे माहेर पोरेगाव जि. लातूर हे आहे. ९ वर्षांपूर्वी भाऊसाहेब जाधव या ऊसतोड मजुरासोबत तिचा विवाह झाला होता. मागील सहा महिन्यांपासून बोअर घेण्यासाठी व शेड बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणत नाही म्हणून तिचा छळ सुरु झाला. रविवारी रात्री देखील भांडण झाले. मध्यरात्री तिने सारे झोपेत असताना विषारी द्रव प्राशन केले. पतीने तिला पाहिल्यावर तातडीने स्वाराती रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे वडील अच्यूत शाहू चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन बर्दापूर ठाण्यात पती भाऊसाहेब जाधव, सासरा बालू गेना जाधव, सासू सावित्री बालू जाधव, दीर रावसाहेब बालू जाधव, जाऊ संगीता रावसाहेब जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक ए. डी. विसपुते करत आहेत. तिच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Married wife commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.