वर्ध्यामध्ये विवाहितेने प्रियकरासोबत संपवले जीवन
By Admin | Updated: April 19, 2017 18:01 IST2017-04-19T17:34:00+5:302017-04-19T18:01:53+5:30
समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये विवाहीत प्रेमिकेने प्रियकराबरोबर आत्महत्या केली

वर्ध्यामध्ये विवाहितेने प्रियकरासोबत संपवले जीवन
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 19 - येथील समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये विवाहीत प्रेमिकेने प्रियकराबरोबर आत्महत्या केली आहे. तरूणी आठ माहिन्याची गरोदर होती. ही घटना आज उघडकीस आली आहे.
उबदा येथील शेख आरजू (वय २३) हिचे सहा वर्षापूर्वी नांदेड येथे लग्न झाले होते . ती आठ महिन्याची गरोदर होती. प्रसुतीसाठी उबदा येथील माहेरी आली होती. लग्नापूर्वी तीचे फकीरवाडी येथील शेख राजीक शेख अब्बास वय 25 या आत्ये भावासोबतच प्रेमसंबंध होते . लग्नानंतरही दोघं ऐकमेकांना विसरले नाही . शेख आरजू माहेरी आल्यानंतर शेख राजीक शेख अब्बासचे तिच्या घरी जाणे सुरूच होते. मंगळवारी ता. 18 शेख आरजू हिंगणघाटला तपासणीसाठी दवाखाण्यात जाते म्हणून सकाळी दहा वाजता घरून निघाली पण रात्रीपर्यंत ती घरी न आल्यामुळे वडिलांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध केली पण ती आढळली नाही. बुधवारी वडीलांच्या भ्रमणध्वनीवर मृतदेह फकीरवाडीत आढळल्याची वार्ता आली. शेख राजीक शेख अब्बासच्या घरी तिने उंदराचे औषध प्राषण करून तर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करित आहेत .