विवाहितेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: November 2, 2016 06:28 IST2016-11-02T06:28:39+5:302016-11-02T06:28:39+5:30

एका विवाहितेवर तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक बलात्काराची घटना जोगेश्वरीच्या श्यामनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री घडली.

Married rape on marriage | विवाहितेवर सामूहिक बलात्कार

विवाहितेवर सामूहिक बलात्कार


मुंबई : दीड महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर भाड्याचे घर शोधत दिवसभर वणवण करणाऱ्या एका विवाहितेवर तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक बलात्काराची घटना जोगेश्वरीच्या श्यामनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री घडली. त्याच वस्तीत राहणाऱ्या आठ नराधमांना पोलिसांनी अल्पावधीत अटक केली.
आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आठ जणांपैकी एक जण काही गुन्ह्यांत यापूर्वीही आरोपी आहे. बलात्कारित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
हे दाम्पत्य भाड्याने घर शोधण्यासाठी सोमवारी जोगेश्वरी परिसरात आले होते. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करते. तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या महिलेला जोगेश्वरी परिसरात भाड्याने घर शोधण्यास सांगितले होते. घराच्या शोधात पीडित महिला पतीसोबत सोमवारी रात्री सहकारी महिलेच्या घरी आली होती. स्वत: रात्रपाळीला निघून जाताना या महिलेने त्या जोडप्याला रात्री तिच्याच घरी मुक्काम करण्यास सांगितले.
ती महिला कामावर गेल्यानंतर रात्री या जोडप्याचे कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा आवाज घराबाहेर नशा करत बसलेल्या चरसी आणि गर्दुल्ल्यांनी ऐकला. त्यांच्यापैकी एक जण झोपडीत आला. त्याने या जोडप्याला शिवीगाळ सुरू केली. या महिलेने प्रत्युत्तर दिल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर या टोळक्यातील बाकीचे तेथे आले आणि महिलेच्या पतीला मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून त्याच्यादेखत पत्नीवर बलात्कार केला. आवाजाने रहिवासी जमू लागल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
बलात्कारित महिलेच्या पतीने तक्रार केल्यानंतर अवघ्या काही तासांत अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने आठही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Married rape on marriage