विवाहितेचा छळ : पाच जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: October 13, 2014 13:19 IST2014-10-13T13:16:55+5:302014-10-13T13:19:55+5:30

माहेरून २५ हजार रुपये घेऊन ये अशी मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Married to Marriage: Crime against five people | विवाहितेचा छळ : पाच जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ : पाच जणांविरुद्ध गुन्हा

 सोलापूर : माहेरून २५ हजार रुपये घेऊन ये अशी मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती रवि सुभाष जेटीथोर, सासू रंजना सुभाष जेटीथोर, सासरा सुभाष जेटीथोर, नणंद उज्ज्वला वाघमारे, जाऊ स्वाती (सर्व रा. सम्राट चौक चंडक शाळेच्या बाजूला, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सासरच्या पाच जणांनी माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत शिवीगाळ व मानसिक छळ करून रेश्मा रवि जेटीथोर (वय २१) या विवाहितेस घरातून हाकलून दिले. तपास सपोनि भुसनुर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Married to Marriage: Crime against five people