रिलेशनशिप ठेवण्यासाठी विवाहितेला ब्लॅकमेल करणा-याला अटक

By Admin | Updated: February 13, 2017 10:23 IST2017-02-13T10:19:23+5:302017-02-13T10:23:24+5:30

लग्नानंतर विवाहबाहय संबंध ठेवण्यासाठी पूर्वप्रेयसीवर दबाव आणणा-या 27 वर्षीय आरोपीला खार पोलिसांनी अटक केली आहे.

Married to blackmail the bride to keep a relationship | रिलेशनशिप ठेवण्यासाठी विवाहितेला ब्लॅकमेल करणा-याला अटक

रिलेशनशिप ठेवण्यासाठी विवाहितेला ब्लॅकमेल करणा-याला अटक

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - लग्नानंतर विवाहबाहय संबंध ठेवण्यासाठी पूर्वप्रेयसीवर दबाव आणणा-या 27 वर्षीय आरोपीला खार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी खार पश्चिमेला राहतो. पीडित महिलासुद्धा त्याच भागात राहते. लग्नाआधी दोघांचे प्रेमसंबंध होते. 
 
महिलेचा विवाह झाल्यानंतर आरोपी तिला फोन करुन भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. आपल्याला भेटायला आली नाहीस तर, लग्नाआधीचा दोघांचा फोटो नव-याला पाठवीन अशी आरोपी धमकी देत होता. पण महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 
 
त्या रागातून त्याने रिलेशनशीपमध्ये असतानाचा फोटो महिलेच्या पतीला व्हॉटस अॅपवर पाठवला. त्यानंतर पीडित महिलेने खार पोलिस स्टेशन गाठले व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 

Web Title: Married to blackmail the bride to keep a relationship