विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: July 12, 2017 20:44 IST2017-07-12T20:44:39+5:302017-07-12T20:44:39+5:30

एका विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या वखार सोहेल खान (२२, रा. हाजुरी दर्गा, वागळे इस्टेट, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Married after mauling | विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास अटक

विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास अटक

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 12 - एका विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या वखार सोहेल खान (२२, रा. हाजुरी दर्गा, वागळे इस्टेट, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

नौपाड्याच्या टेकडी बंगला परिसरात राहणारी ही ३७ वर्षीय महिला १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हरिनिवास येथून गजानन वडापाव दुकानासमोरून गावदेवी मार्केट भागातून पायी जात होती. त्या वेळी त्याने तिचा पाठलाग केला. ती ठाणे हेल्थ केअर या खासगी रुग्णालयासमोर आली असता, त्याने तिचा हात खेचून विनयभंग केला. त्यानंतर, तिच्याकडे संपर्क क्रमांकही मागितला. तिने त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी वेगवेगळे रस्ते बदलले. तरीही, तो पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पतीशी संपर्क करून त्याची चांगलीच धुलाई केली. नंतर, त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनिरीक्षक एन.आर. तायडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Married after mauling