शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गड किल्ल्यांवर लग्न होणार नाही: जयकुमार रावल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:28 IST

शिवरायांची भूमिका केली म्हणून कोणी त्या सारखे ठरत नाही, अशी टीका रावल यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केली. ..

ठळक मुद्देगड किल्ले लग्नासाठी देणार असल्याचे वृत्त शुक्रवारी आल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीकानिवडक २५ किल्ल्यांचा समावेश पर्यटन धोरणांतर्गत करण्यात येणारकिल्ले पर्यटनासाठीचे हे प्राथमिक धोरण राज्यातील ५१ किल्ले संरक्षित 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले सोडून, इतर किल्ल्यांच्या विकासाचे राज्य सरकारचे धोरण आहे. पुरातत्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता, राज्यात अनेक गड, किल्ले दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी यासाठी गुंतवणूकदारांची मते आजमावली जातील. त्यानंतरच धोरण ठरविले जाईल. मात्र, हे किल्ले देखील लग्नासाठी भाड्याने दिले जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  राज्यातील गड किल्ले लग्नासाठी देणार असल्याचे वृत्त शुक्रवारी आल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका सुरु झाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असलेले पर्यटन मंत्री यांनी शुक्रवारी तातडीची पत्रकार परिषद बोलावून, धोरणाची माहिती दिली. रावल म्हणाले, राज्यात वर्ग एक, दोन आणि तीन मधील किल्ले आहेत. वर्ग एक मधील किल्ले संरक्षित श्रेणीमधे मोडतात. ते सर्व पुरातत्व विभागाकडे आहेत. पर्यटन विभागाच्या ताब्यात रत्नागिरीतील हरणाई आणि सिंधूदूर्ग मधील निवती हे किल्ले आहेत. तर, अहमदनगरमधील मांजरसुंभा हा किल्ला आम्ही घेणार आहोत. संरक्षित श्रेणी आणि पर्यटन विभागाच्या ताब्यातील किल्ले वगळता उर्वरीत महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. त्याची यादी तयार करण्यात येत आहे. त्यातील निवडक २५ किल्ल्यांचा समावेश पर्यटन धोरणांतर्गत करण्यात येणार आहे. किल्ले पर्यटनासाठीचे हे प्राथमिक धोरण आहे. त्यानंतर गुंतवणुकदारांकडून मते मागविली जातील. त्यानुसार धोरण ठरेल. मात्र, कोणत्याही प्रकारे लग्न समारंभासाठी हे किल्ले दिले जाणार नाहीत. संग्रहालय, लाईट अँड साऊंड शो, रोप वे अशा प्रकारचे काही उपक्रम राबविता येऊ शकतात. गुंतवणूकदारांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राहील. तसेच, देखभाल दुरुस्ती देखील पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार करण्यात येईल. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, पॉंडीचेरी, गोवा या राज्यांनी गड-किल्ल्यांबाबत पर्यटन धोरण या पुर्वीच तयार केले आहे. त्या प्रमाणे दुर्लक्षित किल्ल्यांबाबत आपणही धोरण तयार करीत असल्याचे रावल म्हणाले. यापुर्वीच्या सरकारने किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही धोरण आखले नाही. राज्य सरकार तसे धोरण तयार करीत आहे. मात्र, त्यावरुन काही व्यक्ती राजकारण करीत आहेत. शिवरायांची भूमिका केली म्हणून कोणी त्या सारखे ठरत नाही, अशी टीका रावल यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केली. ----------------

राज्यातील ५१ किल्ले संरक्षित पुरतत्व विभाग संरक्षित आणि असंरक्षित अशी विभागणी करते. त्यानुसार,राज्यातील ५१ किल्ले संरक्षित श्रेणीत मोडत असल्याची माहिती पुरातत्व विभागातील अधिकाºयांनी दिली. रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी यासह विविध किल्ले संरक्षीत श्रेणीत मोडतात.  

टॅग्स :PuneपुणेFortगडPoliticsराजकारणJaykumar Rawalजयकुमार रावलShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस