शिवसैनिकाची कर्तव्य बजावणा-या महिला पोलीसाला मारहाण
By Admin | Updated: February 26, 2016 18:50 IST2016-02-26T18:46:40+5:302016-02-26T18:50:40+5:30
महिला ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी एका शिवसैनिकाला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील नितिन कंपनीच्या चौकात हा प्रकार घडला

शिवसैनिकाची कर्तव्य बजावणा-या महिला पोलीसाला मारहाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - महिला ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी एका शिवसैनिकाला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील नितिन कंपनीच्या चौकात गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. मोबाईल फोनवर बोलत असलेल्या शशीकांत कलगुडे या ड्रायव्हरला बघून या महिला हवालदाराने त्याला हटकले. तिला टाळून त्याने तशीच गाडी दामटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या हवालदाराने तिचा रस्ता अडवला. तिनं त्याच्याकडे वाहन परवाना व अन्य कागदपत्रांची विचारणा केली असता शशीकांतने गाडीतून खाली उतरत आपलं कर्तव्य बजावणा-या या हवालदाराला मारहाण केली.
हा सगळा प्रकार सीसीटिव्ही कॅमे-यातही कैद झाला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी बघ्यांची गर्दी झाली, परंतु या महिलेच्या मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. परंतु तिथून जाणा-या प्रतीक पवार या वकिलाने तिला मदत केली आणि नंतर कालगुडेला पोलीसांच्या हवाली केले. त्याला नंतर न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.