वडाळ्यात विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: April 29, 2016 03:09 IST2016-04-29T03:09:42+5:302016-04-29T03:09:42+5:30

किरकोळ घरगुती भांडणातून नीतू उमेश दुबे या २६ वर्षीय विवाहितेने गुरुवारी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.

Marriage suicides in Vadodara | वडाळ्यात विवाहितेची आत्महत्या

वडाळ्यात विवाहितेची आत्महत्या

मुंबई : किरकोळ घरगुती भांडणातून नीतू उमेश दुबे या २६ वर्षीय विवाहितेने गुरुवारी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले दुबे कुटुंबीय ४ महिन्यांपूर्वीच मुंबईत आले. अ‍ॅण्टॉप हिल झोपडपट्टीमध्ये पती-पत्नी राहत होते. लग्नाला चार वर्षे झाली असून उमेश मजूर आहे. उमेशला कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याने गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. उमेश नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडल्यानंतर नीतूने स्वत:ला घरात कोंडून घेतले आणि अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.
काही वेळात घरी आलेल्या उमेशला घरातून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याने दरवाजा तोडला. नीतू जळालेल्या अवस्थेत आढळली. वडाळा टी.टी. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेतली. त्यात अडगळीच्या ठिकाणी घर असल्याने नीतूला खाली उतरविण्यासाठी पोलिसांना बराच वेळ गेला. नीतूला सायन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती
वडाळा टी. टी. पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage suicides in Vadodara