...यासाठी उद्धव ठाकरे टाळतायत दानवेंच्या मुलाचं लग्न

By Admin | Updated: March 2, 2017 10:43 IST2017-03-02T10:33:00+5:302017-03-02T10:43:14+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत.

The marriage of the son of a demon has prevented Uddhav Thackeray for ... | ...यासाठी उद्धव ठाकरे टाळतायत दानवेंच्या मुलाचं लग्न

...यासाठी उद्धव ठाकरे टाळतायत दानवेंच्या मुलाचं लग्न

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 2 -  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा विवाहसोहळा आज औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. 
मात्र, युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत शिवसेनेला द्यायचे नाहीत, अशी  सूत्रांची माहिती आहे.
(देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे)
 
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात जाणे टाळत असल्याचे माहिती आहे.  
दरम्यान, उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. क्षीरसागर आणि दानवे या दोघांच्या मुलांच्या लग्नाचा मुहूर्त संध्याकाळचा आहे. पण उद्धव औरंगाबादला न जाता कोल्हापुरात हजेरी लावणार आहेत.

Web Title: The marriage of the son of a demon has prevented Uddhav Thackeray for ...