लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार

By Admin | Updated: July 3, 2016 22:25 IST2016-07-03T22:25:56+5:302016-07-03T22:25:56+5:30

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून दिड लाख रुपये घेतल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Marriage rape rape businessman | लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून दिड लाख रुपये घेतल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हितेंद्र महाविर घोष (वय 40, रा. रचना मंदिर, सांताक्रुझ, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिलेचा स्वत:चा व्यवसाय असून त्यांची फ्लेक्स प्रिटींगची मशीन असून त्या सर्व माल विदेशात निर्यात करतात. आरोपी आणि पिडीत महिला दोघेही अविवाहीत आहेत.
पिडीत महिलेसोबत आरोपीची शादी डॉट कॉम या लग्न जुळवणा-या संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. त्याने महिलेसोबत ओळख वाढवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिच्याकडून 1 लाख 55 हजार रुपये उकळले. लग्न न करता आपली फसवणूक करण्यात आल्याची तक्रार या महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक निता गायकवाड करीत आहेत.

Web Title: Marriage rape rape businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.