चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ

By Admin | Updated: September 18, 2016 01:59 IST2016-09-18T01:59:27+5:302016-09-18T01:59:27+5:30

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेची शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह दोघी नणंदाच्या विरोधात महाड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Marriage out of suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ


महाड : चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह दोघी नणंदाच्या विरोधात महाड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तालुक्यातील करंजाडी या गावात ही घटना घडली.
सोनल सचिन मालुसरे या विवाहितेने या छळवणुकीबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सचिन राजाराम मालुसरे (पती), पुष्पा दिनेश आंब्रे (रा. लोट्याचा माळ, ता. खेड) व विमल रमेश तांबे (रा. खारदांडा मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चार वर्षे सुरु असलेल्या प्रकाराला कंटाळून सोनलने पोलीसात तक्रार केली. मारहाणीत सोनल जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (वार्ताहर)
>चार वर्षांपासून पती आणि त्याच्या बहिणींकडून सोनलचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात येत होता. मारहाणीत सोनल जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Marriage out of suspicion of character