अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !
By Admin | Updated: May 3, 2016 02:20 IST2016-05-03T02:20:56+5:302016-05-03T02:20:56+5:30
अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. महाराष्ट्र दिनी रविवारी गावात एकाच मांडवात सहा विवाह होणार होते.
अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. महाराष्ट्र दिनी रविवारी गावात एकाच मांडवात सहा विवाह होणार होते. पैकी पाच विवाह झाले; मात्र, एका वऱ्हाडाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता (नाव बदलले आहे) हिचा विवाह रविवारी धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव काळे याच्याशी होणार होता. त्यांच्यासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. गावकरी लगबगीत असतानाच पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहने गावात धडकली. अधिकाऱ्यांनी सीता, बाबाराव काळे या जोडप्याची शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ असल्याचे समोर आले. महसूल व पोलीस प्रशासनाने विवाह रद्द करीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून लिहून घेतले.