इंडोनेशियातही लग्न

By Admin | Updated: October 28, 2015 22:08 IST2015-10-28T22:08:42+5:302015-10-28T22:08:42+5:30

छोटा राजनने इंडोनेशियातील एका महिलेशी लग्न केल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस दलाच्या सूत्रांनी सांगितले की

Marriage in Indonesia | इंडोनेशियातही लग्न

इंडोनेशियातही लग्न

मुंबई : छोटा राजनने इंडोनेशियातील एका महिलेशी लग्न केल्याचे वृत्त आहे.  मुंबई पोलीस दलाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘‘तीन ते चार वर्षांपूर्वी राजनने इंडोनेशियन महिलेशी लग्न केल्याची आमची माहिती आहे. त्याला आपली काही ओळख हवी आणि आपल्या धंद्यासाठी एक चेहरा असावा, असे त्याला वाटायचे. राजनचे हे तिसरे लग्न होते. त्याच्याआधी तेहरानमध्ये त्याने एकीशी लग्न केले होते परंतु २००० मध्ये त्याच्यावर बँकॉकमध्ये हल्ला झाल्यावर त्याने तिला सोडले’’, असे माजी एन्काऊंटर तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. इंडोनेशियन महिलेशी लग्न करून त्याचा कोणता हेतू साध्य झाला, असे विचारता सूत्रांनी सांगितले की, ‘‘स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असते तर ती महिला मी त्याची पत्नी आहे, असे म्हणू शकते. ही बाब त्याच्यासाठी व्यूह म्हणून खूपच उपयोगी ठरणार होती. शिवाय अशा महिलेवर धंद्याच्या व्यवहारांत पत्नी म्हणून तो विश्वासही ठेवू शकत होता.’’ दरम्यान सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मला याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage in Indonesia