विवाहितेची हत्या,कुलाब्यातील घटना; दिराच्या मित्रावर संशय

By Admin | Updated: May 12, 2017 03:17 IST2017-05-12T03:17:14+5:302017-05-12T03:17:21+5:30

कुलाब्यामध्ये २८ वर्षांच्या विवाहितेची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. श्वेता महेंद्र तांडेल असे तिचे नाव आहे.

Marriage, culpable killings; The friend's friend doubted | विवाहितेची हत्या,कुलाब्यातील घटना; दिराच्या मित्रावर संशय

विवाहितेची हत्या,कुलाब्यातील घटना; दिराच्या मित्रावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुलाब्यामध्ये २८ वर्षांच्या विवाहितेची गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. श्वेता महेंद्र तांडेल असे तिचे नाव आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात पती, दीर व त्याचा मित्र संशयाच्या घेऱ्यात आहेत.
कुलाबावाडीतील सुंदर नगरीमध्ये श्वेता पती, दीर आणि दीराच्या मित्रासोबत एक मजली घरात राहत होती. मंगळवारी पती आणि दीर कामानिमित्त बाहेर गेले होते. दीराचा मित्र वरच्या खोलीत होता. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो खालच्या खोलीत आला असता श्वेता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
कुलाबा पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे. घरातून काहीही चोरीला गेलेले नाही. त्यामुळे यामागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय असून त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Marriage, culpable killings; The friend's friend doubted