शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बाजारपेठा गजबजणार; राज्यात निर्बंध शिथिल; वाचा काय सुरु राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:00 IST

पुनश्च हरिओम : लॉकडाऊनला टप्प्याटप्प्याने बाय बाय !

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आले असून मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता बाजारपेठेतील दुकाने ५ जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेली अडीच महिने ठप्प असलेली बाजारपेठ पुन्हा गजबजणार असून ग्राहकांसह व्यापारी व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल.लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवत मिशन बिगीन अगेन म्हणजेच ‘पुनश्च हरिओम’चा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने गुरुवारी नियमावलीत काही सुधारणा केल्या. आता मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील महापालिका आणि पालिकाक्षेत्रादरम्यान (एमएमआर) प्रवासासाठी निर्बंध उठविण्यात आले आहेत. याआधी फक्त अत्यावश्यक सेवा तसेच तातडीच्या पाससह प्रवास करण्यासच परवानगी होती.मुंबईसह रेड झोनमधील १९ महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये खासगी कार्यालये ८ जूनपासून दहा टक्के किंवा दहा यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या उपस्थितीने सुरू करता येतील. उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय राहील. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविण्याव्यतिरिक्तची कामे सुरू करता येतील. आॅनलाईन शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी तसेच निकाल जाहीर करणे या कामांचा त्यात समावेश आहे.दुकानांसाठीसम-विषम नियमसर्व प्रकारची दुकाने ५ जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सम-विषम असे सूत्र असेल. सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूची दुकाने उघडी राहतील तर विषम तारखेला त्याच्या समोरच्या बाजूची दुकाने उघडी राहणार आहेत. दुकानात गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यायची आहे. शक्य असेल तिथे होम डिलिव्हरीचा पर्याय राहील.रविवारपासूनवृत्तपत्रे घरपोचसर्वत्र येत्या रविवारपासून (७ जून) वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरुणांची काळजी घेणे आवश्यक असून त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.काय सुरू होणार?उद्यानात जाता येणार. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करता येणार, मात्र कोणत्याही ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीला परवानगी नाही. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा. गॅरेज, वर्कशॉप सुरू होणार.03 जूनपासूनच हे सर्व सुरू करण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी जसे उद्याने जीम येथे गेल्यास तेथील साधनांचा वापर करता येणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस