बाजारात आंब्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 04:41 IST2016-04-29T04:41:10+5:302016-04-29T04:41:10+5:30
रत्नागिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात विविध जातींचे आंबे विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहेत.

बाजारात आंब्याची आवक वाढली
डहाणू/बोर्डी: रत्नागिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात विविध जातींचे आंबे विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान कार्बोईटद्वारे फळे पिकविण्यावर बंदी आल्याने फळ विक्रेत्यांकडे आंब्याचा ओघ काही प्रमाणात कमी झाल्याचे घावूक फळविक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी, स्थानिक आंब्याची चव चाखण्यासाठी २० ते २५ दिवस वाट पहावी लागणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही रत्नगिरीहून येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने डहाणू तालुक्यातील फळ बाजारात आंबा दाखल झाला आहे. त्यानुसार हापूस ७० रु, लालबाग ४० रु, पायरी ५० रु, बदाम ३५ रु आणि तोतापुरी २५ रु. या प्रती किलोच्या दराने उपलब्ध झाल्याचे जय भोले फ्रूटचे सुवंश यादव यांनी सांगितले.
शासनाने फळे पिकविण्याकरिता वापरण्यात येणार्यार कर्बोईट्वर बंदी घातल्याने, इथेलीन रायपिंग गॅसचा वापर केला जातो. असे असले तरी, कार्बोईटच्या तुलनेत कमी दिवसात फळे पिकावता येत नाहीत. त्यामुळे हातगाडीवरील फळ विक्रेत्यांकडून मागणी असताना त्या प्रमाणात घावूक विक्रेत्यांना पुरवठा करता येत नाही. त्याचा फायदा ग्राहकांना होत असून चविष्ट फळे चाखायला मिळत असल्याचे यादव म्हणाले. दरम्यान, स्थानिक आंबा बाजारात यायला मे महिन्याचा किमान तिसरा आठवडा उजाडावा लागेल असे राकेश सावे या बोडीर्तील आंबा बागायतदाराने सांगितले. बोडीर्तील आंब्यांच्या बागांमध्ये केशर आंब्यांची संख्या अधिक असून, हा चविष्ट आंबा स्थानिक बाजारात आल्यास सामान्य नागरिकांनाही अल्प दरात आंब्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो. (वार्ताहर)