राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील नोकरभरतीला पणन मंडळाने ब्रेक लावला आहे. ‘पणन’ने बाजार समित्यांसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या शिफारसीनंतर भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. भरतीसोबतच परंपरागत नियुक्तींनाही मान्यता दिली जाणार नसल्याचे समित्यांना कळवले आहे.राज्यात ३०५ शेती उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. शेती मालाची आवक, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि अस्थापनावर होणारा खर्च याचा ताळमेळ घालताना बाजार समित्यांची पुरती दमछाक होत आहे. अनेक समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नाहीत. बाजार समित्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून, काही समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारमध्ये केला आहे.समित्यांचा अभ्यास समिती गठित करण्यात आली असून ही समिती कार्यकक्षा निश्चित करणार आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शासनाकडून धोरण निश्चित होईपर्यंत समित्यांनी परंपरागत नियुक्त्यांसह नवीन भरतीस बंदी घातली आहे.
बाजार समित्यांचे विभाजन लटकले
राज्य शासनाने तालुकानिहाय बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुकानिहाय माहीती मागवली आहे; पण त्या तालुक्यात पुरेसा शेतीमाल आहे का? त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अस्थापनासह इतर खर्च मागणार का? हे प्रश्न सध्या शासना समोर आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून समित्या चालणार का? याविषयी सध्या शासनस्तरावर चाचपणी सुरू आहे.
राष्ट्रीय बाजार समित्यांची अद्याप यादीच नाहीमुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर या बाजार समित्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, शासनपातळीवर राज्यातील समावेश होणाऱ्या समित्यांची यादीच तयार झालेली नाही.
असे आहे समित्यांचे वार्षिक उत्पन्नउत्पन्न मर्यादा - समित्यांची संख्या२५ कोटींपेक्षा अधिक - ०५१० ते २५ कोटी - १५५ ते १० कोटी - २३२.५० ते ५ कोटी - ६०१ ते २.५० कोटी - ९१५० लाख ते १ कोटी - ५४२५ ते ५० लाख - २७२५ लाखांपेक्षा कमी - ३०
राज्यातील एकूण सर्व बाजार समित्यांचा शासन पातळीवर आढावा घेतला जात आहे. यातून काही धोरण करता येते का? यासाठी नोकरभरतील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. - विकास रसाळ (पणन संचालक)
Web Summary : Maharashtra halts market committee recruitments. A committee reviews finances, income impacting staff salaries. New policy pending for appointments and traditional postings. Committee recommendations will determine future hiring practices.
Web Summary : महाराष्ट्र में बाजार समिति भर्ती रुकी। वित्तीय समीक्षा, वेतन पर प्रभाव। नियुक्तियों, पारंपरिक पोस्टिंग पर नई नीति लंबित। समिति सिफारिशें भविष्य की भर्ती निर्धारित करेंगी।