शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:58 IST

बाहेरचे लोक उपद्व्याप करत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनातेपुते (जि. सोलापूर) : मारकडवाडी येथे सभा घेऊन शरद पवार मागे फिरताच काही ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात एकत्र येऊन राम सातपुतेंच्या समर्थनार्थ आणि ईव्हीएमच्या बाजूने घोषणा दिल्या. ‘जय श्रीराम’च्याही घोषणा दिल्या.

मारकडवाडी येथे मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे यादीसह फलक लावण्यात आले होते. सातपुते यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल स्वागताचा बॅनर पवारांच्या सभेच्या ठिकाणी लावला होता. तो बॅनर पवारांना दिसू नये म्हणून त्या बॅनरच्या आडवा बॅनर जानकर समर्थकांनी लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, नंतर आडवा लावलेला बॅनर काढण्यात आला.

यावेळी पांडुरंग चोपडे व अजिंक्य मारकड म्हणाले, जानकरांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. गावपुढाऱ्यांनी पैसे आणले पण होते, पण तरीही जानकरांना मारकडवाडीत अपेक्षित मतदान झाले नाही. कधीही निवडणूक घ्या, मारकडवाडी गाव विकासाच्या मागे उभे आहे. गावातील चार पुढारी एकत्र येऊन हा स्टंट चालू आहे. पवारांच्या सभेवेळी बाहेरचा पुढारी दमदाटी करत असल्याचे मारकडवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.

मारकडवाडी येथील जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही. मोहिते-पाटील आणि जानकरांचे चॅलेंज स्वीकारतो. कधीही निवडणूक लावावी. निवडणूक प्रशासनाने घ्यावी. कार्यकर्त्यांनी नव्हे, असे माजी आमदार राम सातपुते म्हणाले.

शरद पवारांनी पराभव मान्य करावा : मुख्यमंत्री फडणवीसशिरूर (जि. पुणे) :  विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेच्या कौल मान्य करत पराभव स्वीकारावा, कार्यकर्ते व खोटे सांगणारे नेत्यांचे ऐकू नये अन्यथा लोकशाही प्रक्रियेवारील लोकांचा विश्वास उडेल. अशी कार्यवाही किमान शरद पवारांनी करू नये. शरद पवार हे ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा नेत्यांनी संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांना दिला.

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनSharad Pawarशरद पवारBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४