मार्चची परीक्षाही लोडशेडिंगमुक्त
By Admin | Updated: September 24, 2014 05:31 IST2014-09-24T05:31:32+5:302014-09-24T05:31:32+5:30
येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील दहावी व बारावीची परीक्षा घेणाऱ्या परीक्षा केंद्रांवर लोडशेडिंग होणार नाही, यासाठी काय करता येईल याची योजना आतापासून

मार्चची परीक्षाही लोडशेडिंगमुक्त
मुंबई : येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील दहावी व बारावीची परीक्षा घेणाऱ्या परीक्षा केंद्रांवर लोडशेडिंग होणार नाही, यासाठी काय करता येईल याची योजना आतापासून आखा, असे आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़
परीक्षा केंद्रे लोडशेडिंगमुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने २००८ मध्ये शासनाला दिले आहेत़ मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याने नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी शासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली़ त्याची दखल घेत न्यायालयाने आॅक्टोबरला होणारी दहावी व बारावीची परीक्षा लोडशेडिंगमुक्त करण्याचे आदेश शासनाला दिले़ त्यानुसार परीक्षा केंद्रांवर दिले जाणारे जनरटेर व इतर सुविधांचा लेखाजोखा शासनाने न्यायालयात सादर केला़ त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले व ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)