शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मार्च, एप्रिल एकही मुहूर्त नाही! नोव्हेंबर महिन्यात धूमधडाक्यात होणार शुभमंगल सावधान; मे महिन्यातील उकाड्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 09:04 IST

हिंदू समाजात मुहूर्त पाहूनच इच्छुक वधू-वर बोहल्यावर उभे राहतात २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्च, एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त एकही नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती, तर मे महिन्यात काही जोडप्यांची दणक्यात लग्न झाली हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत, आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना नोव्हेंबरमध्ये धुमधडाक्यात विवाह करता येणार आहे.

हिंदू समाजात मुहूर्त पाहूनच इच्छुक वधू-वर बोहल्यावर उभे राहतात २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल्ल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी आपले लग्न पुढे ढकलले. जूनमध्ये मुहूर्त असले तरी लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी पावसाळ्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, पितृपक्षामुळेदेखील अनेक विवाह रखडले आहेत.

अनंत चतुर्दशीच्या पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष दि. २९ सप्टेंबर पासून १४ ऑक्टोबर या कालावधीत होता. पितृपक्षात तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, अशी समज आहे.

२०२३ मध्ये हे आहेत लग्नाचे मुहूर्तनोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९ डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५ 

आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणतेऑक्टोबर : १६, २०, २२, २३, २४, २६ नोव्हेंबर : १, ६, १६, १८, २०, २२

नातेवाइकांची लगबग सुरूलग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जूननंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्न कण्यासाठी नातेवाइकांची लगबग सुरू झाली आहे सभागृह,  लॉन, हॉटेल्स तसेच मंगल कार्यालये बुक केली जात आहेत.

बँड बाजाची जोरदार तयारीलग्नसोहळा एकदाच होत असल्याने, विवाह दणक्यात साजरा करण्यासाठी बँड बाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. त्यासाठी आतापासून बुकिंग केले जात आहे. लग्नात येणाऱ्या यजमानांना चविष्ट जेवण खाऊ घालण्यासाठी मेनू ठरवायचा याचे बेत आखले जात आहेत. 

येत्या दोन महिन्यांत विवाह पितृपक्षात घरात सुख-शांती नांदते, असे लोक मानतात या काळात शुभकार्य केली जात नाहीत, त्यामुळे नुकतेच जमलेले विवाह येत्या दोन महिन्यांत होणार आहेत.   

 

टॅग्स :marriageलग्न