जायकवाडीवरून मराठवाड्याचे पाणी पेटले!

By Admin | Updated: October 20, 2015 01:29 IST2015-10-20T01:29:17+5:302015-10-20T01:29:17+5:30

नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यावरून विरोधाची धार तीव्र झाली आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांत आंदोलन झाले.

Marayawada water from Jalavade! | जायकवाडीवरून मराठवाड्याचे पाणी पेटले!

जायकवाडीवरून मराठवाड्याचे पाणी पेटले!

नाशिक/नगर : नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यावरून विरोधाची धार तीव्र झाली आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांत आंदोलन झाले. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत राजकारण पेटले आहे.
माजी मंत्री बबनराव घोलप, आ. अनिल कदम, आ. राजाभाऊ वाजे, आ. योगेश घोलप यांनी सेनेच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. गंगापूर धरणातून प्रस्तावित १.३७ टीएमसी पाणी सोडले तरी ते मराठवाड्यापर्यंतचे अंतर बघता पोहोचणार नाही. मग अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न करत सेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.
काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभाताई बच्छाव, आ. निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली, तर राष्ट्रवादीतर्फे माजी खा. देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना पाणी न सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले.
नगर जिल्ह्यात उद्रेक
नगरमध्ये मुळा, प्रवरा व गोदावरी खोऱ्याच्या पट्ट्यात सोमवारी उद्रेक झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आ. भाऊसाहेब कांबळे यांनी
निदर्शने केली. संगमनेरमध्ये
सामूहिक मुंडण करून निषेध करण्यात आला.
अकोले, राहुरी, कोपरगाव तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्ते व शेतकरी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले.
कोपरगावात भाजपा आ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. अकोल्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व केले. (प्रतिनिधी)

भाजपाचे समर्थन
मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी सोडण्यास हरकत नाही, असे मत भाजपा
आ. बाळासाहेब सानप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

विखे, कर्डिलेंचे आज आंदोलन
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व भाजपा आ. शिवाजी कर्डिले मंगळवारी राहाता व राहुरी येथे आंदोलन करणार आहेत.

Web Title: Marayawada water from Jalavade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.