शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मराठवाड्याच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!

By admin | Updated: July 28, 2015 02:14 IST

दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात

- संजय जाधव,  पैठणदारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोडलेले १० हजार ५०० क्युसेक्सने पाणी केवळ १ हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यातून जवळपास १७.३१७ दलघमी पाणी उपसण्यात आले आहे. या साठ्यात ४० टक्के गाळ साचलेला असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे गंभीर सावट पसरलेले आहे. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणात पाणी आले नाही, तर मोठी पाणीकपात करूनही वर्षभर पाण्याचे नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यातच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. काय आहे नियम?समन्यायी पाणीवाटपासंदर्भात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने केलेल्या नियमानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर कोणत्याही कालव्याद्वारे पाणी वळविण्यात येऊ नये, तसेच उच्चपातळी बंधारे मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमास धाब्यावर बसवून अन्याय केला आहे.तब्बल ५२ तासांनी पाणीदारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख या बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु जवळपास सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली. बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासांत पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले आहे. - १५ आॅक्टोबरनंतर आढावा घेऊन वापरलेले पाणी व प्रकल्पात शिल्लक असलेला साठा विचारात घेऊन खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दारणा धरणातून पाणी कसे सुटले याबाबत मला माहीत नाही. तेथील मुख्य अभियंत्यांना विचारा, ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.