मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा!
By Admin | Updated: November 16, 2014 01:37 IST2014-11-16T01:37:11+5:302014-11-16T01:37:11+5:30
महसूल विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारीने अवघा मराठवाडा ‘दुष्काळवाडा’ जाहीर केला.

मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा!
सुधारित पैसेवारी जाहीर : 8क्क्4 गावांत खरीप पिकांची दैना
औरंगाबाद : महसूल विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारीने अवघा मराठवाडा ‘दुष्काळवाडा’ जाहीर केला. विभागातील 8,139 गावांपैकी तब्बल 8,क्क्4 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आली आहे. त्यामुळे विभागातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
पुरेशा पावसाअभावी यंदा संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. ऑगस्टनंतर पाऊसच न झाल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले, तसेच रबीची पेरणीही होऊ शकलेली नाही. अनेक गावांमध्ये सप्टेंबरपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे विभागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ज्या पैसेवारीवर अवलंबून असते, ती पैसेवारी योग्य पद्धतीने काढण्यात यावी, अशी मागणीही सातत्याने होत होती. या पाश्र्वभूमीवर महसूल विभागाने शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी जाहीर केली. मराठवाडय़ात एकूण 8,536 गावे आहेत. यापैकी प्रशासनाने 8,139 गावांची पैसेवारी जाहीर केली आहे. त्यातील जवळपास सर्वच म्हणजे 8,क्क्4 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आली आहे. या गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, पावसाचे प्रमाणही सरासरीपेक्षा कमी आहे. (प्रतिनिधी)
च्मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत सर्व शासकीय नियम बाजूला ठेऊन शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
च्शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ शनिवारी दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी रवाना झाले. शिष्टमंडळाने मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिलंना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
135 गावांची पैसेवारी जास्त
केवळ 135 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर आहे. यातील 46 गावे औरंगाबाद जिलतील, 26 गावे बीड जिलतील आणि 63 गावे उस्मानाबाद जिलतील आहेत.
15 डिसेंबरला अंतिम पैसेवारी
आता 15 डिसेंबर रोजी खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर होईल. मात्र, खरीप हंगाम आताच
संपला असल्याने यापुढे पाऊस झाला, तरी शेतक:यांचे नुकसान भरून निघणार नाही. परिणामी, अंतिम पैसेवारीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे अधिका:यांनी सांगितले. यामुळे मराठवाडय़ात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होऊन शेतक:यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.