शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:08 IST

Marathi vs Gujarati Issue: घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल कम्पाऊंड हा भाग उत्तर -पूर्व मतदारसंघात येतो. येथून महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील निवडणूक लढवत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, अशा धाटणीची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता घाटकोपरमध्ये एका गुजरातीबहुल इमारतीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचार पत्रके वाटण्यास मज्जाव करत इमारतीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन कार्यकर्त्यांना प्रवेश दिला. 

घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल कम्पाऊंड हा भाग उत्तर -पूर्व मतदारसंघात येतो. येथून महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील निवडणूक लढवत आहेत. रविवारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या भागात  प्रचार करत होते. प्रचार पत्रके वाटण्यासाठी ते या भागातील ‘समर्पण’ इमारतीत  गेले. मात्र, तेथे त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सोसायटीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांत वाद झाला. दोन्ही बाजूने हमरीतुमरी सुरू झाली. कार्यकर्ते इमारतीत प्रवेश करण्यासाठी अडून  बसले होते.  मात्र त्यांना प्रवेश दिला गेला नव्हता. 

सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे...आम्ही भाजपचे पदधिकारी असून आम्ही भाजपलाच मतदान करणार असल्याने तुम्हाला इमारतीत जाता  येणार नाही.

कार्यकर्त्यांचे म्हणणे...आम्ही केवळ पत्रके देण्यासाठी जात आहोत. तुम्ही कोणालाही मतदान करा, तो तुमचा  अधिकार आहे. मात्र आम्हाला पत्रके वाटू द्या. मराठीबहुल सोसायट्यांमध्ये अशाप्रकारे जाती-धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावर कोणाला प्रचार करण्यासाठी इमारतीत प्रवेश  करण्यास मज्जाव केल्याचे एकही उदाहरण नाही. परंतु गुजरातीबहुल इमारतीत असे प्रकार वारंवार घडत आहेत. 

सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सोसायट्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केली जाते. कोणाला भेटायचे आहे याची नोंद होते, संबंधित व्यक्ती किंवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच प्रवेश दिला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव आम्हालाही अनेक सोसायट्यांमध्ये प्रचारास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे विशिष्ट इमारतीत, विशिष्ट पक्षाच्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही, हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. - भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक, भाजप

टॅग्स :mumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्वBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmarathiमराठी