मराठी ‘वीणे’वरचा बंगाली स्वरसाज हरपला
By Admin | Updated: May 31, 2015 01:46 IST2015-05-31T01:46:50+5:302015-05-31T01:46:50+5:30
वीणा आलासे यांचे शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कोलकाता येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

मराठी ‘वीणे’वरचा बंगाली स्वरसाज हरपला
नागपूर : कवी ग्रेस, डॉ. द. भि. कुळकर्र्णी , महेश एलकुंचवार यांच्यासारख्या मराठीतील मान्यवर साहित्यिकांची समीक्षा करण्याची ताकद , प्रतिभा , प्रगल्भता आणि अभ्यास असलेल्या व नागपुरातील मराठी मातीत जन्मूनही आपल्या साहित्यिक प्रतिभेने बंगाल जिंकणाऱ्या वीणा आलासे यांचे शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कोलकाता येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्या कोलकात्यात मुलीकडे राहत होत्या. त्यांच्यावर रविवारी तेथेच अंत्यसंस्कार केले जातील. वीणाताईंचा जन्म चंद्रपूरचा. त्यांचे माहेरचे आडनाव देशपांडे. (प्रतिनिधी)
रवींद्रनाथ टॅगोरांवर त्यांनी अभ्यास केला. शांतीनिकेतनातील मराठी विभागात त्यांनी २५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. महात्मा फुलेंच्या गुलामगिरी या ग्रंथाचे त्यांनी बंगालीत अनुवाद केले होेते. त्यांना दोनदा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते़