शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषांतराचा घोळ; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुवाद करून वेळ निभावून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:09 IST

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे भाषण मराठीत सादर करता आले नाही. परिणामी, अधिवेशनाची सुरुवातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माफीने झाली.

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे भाषण मराठीत सादर करता आले नाही. परिणामी, अधिवेशनाची सुरुवातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माफीने झाली. मात्र, जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करताच, प्रत्येक विभागाचे अधिकारी ‘मी नाही, तोच दोषी’ असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.दरवर्षी निवेदक प्रदीप भिडे राज्यपालांचे भाषण मराठीत वाचून दाखवायचे. ते आजारी असल्यामुळे या वर्षी श्रीराम केळकर यांना बोलावण्यात आले होते. त्याप्रमाणे, केळकर विधिमंडळात दाखल झाले, पण चौथ्या मजल्यावर त्यांना सुरक्षारक्षकांनी अडविले. दुसºया मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रस्ताच सापडला नाही. शेवटी त्यांनी आपण राज्यपालांचे भाषण वाचण्यासाठी आलो आहोत, हे सांगितल्यानंतर, त्यांना सभागृहातील बंद खोलीत नेऊन बसविण्यात आले. ११ वाजेपर्यंत ते तिथेच बसून होते.राज्यपालांचे इंग्रजीतून भाषण सुरू झाले, पण मराठी भाषांतर ऐकू येत नसल्याचे लक्षात येताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना इशारा केला. मात्र, कळसे जागेवरच बसून राहिले. तेवढ्याच भाषांतराच्या खोलीत कोणीच दिसत नसल्याचे लक्षात येताच, प्रभारी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे तिथे जाऊन मराठी भाषांतर वाचून वेळ निभावून नेली.मराठी भाषांतराच्या निवेदकाची जबाबदारी माहिती खात्याच्या २ महिला अधिकाºयांवर होती. त्यांनीच केळकरांबाबत विचारपूस करायला हवी होती, पण केळकरांना अडविणारा सुरक्षा रक्षक कोण होता, याची चौकशी सुरू झाली आहे. तर मंत्रालयातील काही अधिकाºयांनी विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यावर जबाबदारी ढकलली आहे.मला भाषांतराचे मानधन मिळेल!या प्रकारावरून अध्यक्ष हरीभाऊ बागडे व सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात तणाव होता. मात्र, मी भाषण वाचून दाखविल्यामुळे मला १० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे, असे तावडे यांनी सांगताच तणाव निवळला.तुम्हाला काम करून घेता येत नाही!मंत्र्यांनी प्रशासनाकडून काम करून घेतले पाहिजे. स्वत:च काम करत बसून शाबासकीसाठी पुढेपुढे करू नये, अशी कोपरखळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018