मराठीला ‘प्राइम टाइम’
By Admin | Updated: April 8, 2015 03:04 IST2015-04-08T02:57:41+5:302015-04-08T03:04:37+5:30
मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल,

मराठीला ‘प्राइम टाइम’
मुंबई : मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
सांस्कृतिक खात्यावरील चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, की मराठीत दर्जेदार चित्रपट तयार होतात; पण सायंकाळी ६ ते रात्री ९ या महत्त्वाच्या वेळेत (प्राइम टाइममध्ये) मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये ते दाखवले जात नाहीत. त्यामुळे सरकारने आता मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, मराठी चित्रपटांना अधिकाधिक सिनेमागृहे उपलब्ध करून दिली जातील. शिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी चित्रफीत प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर दाखविली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)