शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मराठी फलकाला कन्नड समाजकंटकांनी फासले काळे : अनगोळ येथे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 7:26 PM

karnataka, belgaon, kolhapurnews मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावलेल्या मराठी भाषेतील फलकाला दोघा कन्नड समाजकंटकांनी काळे फासल्याचा निंद्य प्रकार शुक्रवारी सायंकाळी अनगोळ येथे घडला.

ठळक मुद्देमराठी फलकाला कन्नड समाजकंटकांनी फासले काळे अनगोळ येथे तणाव, कर्नाटक बंदची हाक

बेळगाव -मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावलेल्या मराठी भाषेतील फलकाला दोघा कन्नड समाजकंटकांनी काळे फासल्याचा निंद्य प्रकार शुक्रवारी सायंकाळी अनगोळ येथे घडला.या अभिनंदनपर फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह मराठी समाजाच्या कांही कार्यकर्त्यांची छायाचित्र छापण्यात आली होती. या फलकाला मराठी द्वेष्ट्या कन्नडिगांनी आज सायंकाळी काळे फासल्यानंतर अनगोळ परिसरात संतापाची लाट उसळून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गळ्यात लाल -पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणाने फलकाला काळे फासण्याचे कृत्य केले असून त्याचे व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. सदर घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडली असून ती घडत असताना कोणीच आक्षेप घेतला नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे फलकाला काळे पासून ते तरुण आरामात बिनबोभाट निघून गेले. सदर घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तो फलक तातडीने तिथून हटविण्यात आला आहे.कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा गेल्या 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. याला राज्यातील कन्नड संघटनांनी विरोध दर्शवून5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर कन्नड संघटनांची धुसफूस सुरूच होती. या संघटनांच्या दबावामुळे राज्य सरकारने प्राधिकरणाचा निर्णय मागे घेऊन मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीदेखील कन्नड संघटनांचा विरोध कायम आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर