शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील फुलपाखरांना मिळाली मराठी नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:54 IST

समितीने प्रथम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजातींच्या यादीस अंतिम स्वरूप देऊन नावे देण्यासाठी निकष ठरविण्यात आले होते.

मुंबई : महाराष्ट्रात सापडणाऱ्या सर्वच फुलपाखरांना मराठमोळ्या भाषेतील नावे असावीत म्हणजे ते लक्षात राहण्यास सोपी होतील व त्यातून अनेक फुलपाखरांची सर्वसामान्यना ओळख सुद्धा होईल व ती नावे सर्वमान्य झाल्यास पक्ष्यांप्रमाणे फुलपाखरे सुद्धा सर्वांच्या परिचयाची वाटू लागतील. यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष तथा फुलपाखरू अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर, मंडळाचे सदस्य डॉ. जयंत वडतकर, फुलपाखरू अभ्यासक तथा बी.एन.एच.एस, चे डॉ. राजू कसंबे, फुलपाखरू अभ्यासक श्री. हेमंत ओगले, श्री. दिवाकर ठोंबरे तथा निमंत्रित सदस्य श्री. अभय उजागरे यांचा समावेश होता.

समितीने प्रथम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजातींच्या यादीस अंतिम स्वरूप देऊन नावे देण्यासाठी निकष ठरविण्यात आले होते. पुढील बैठकीत राज्यात आढळणाऱ्या एकूण २७७ फुलपाखरू प्रजातीस मराठी नावे ठरविलीत, त्यानंतर सदर यादी अभ्यासकांना, सबंधित संस्थांना पाठवून तसेच समाज माध्यम, वेबसाईट, वृत्तपत्र याव्दारे सर्वांसाठी उपलब्ध करून देऊन त्यावर ११ मे पर्यंत सूचना, नावे सुचविण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. त्यानुसार राज्यातून भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (ZSI) वन विभाग, फुलपाखरू तज्ञ श्री आयझँक केहीमकर,  कु. गार्गी गिद, प्रा. अमोल पटवर्धन, प्रा. सुधाकर कुऱ्हाडे, श्री. अभय उजागरे, अशा एकूण २५ संस्था, व्यक्ती, अभ्यासक तथा फुलपाखरू प्रेमीं जणांकडून सुमारे ३७७ नावे तसेच फुलपाखरांच्या कुळांची नावे आणि काही मौलिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.

प्राप्त नावांचा आणि सूचनांचा विचार करून तसेच निकषांचा विचार करून या मराठी नावांच्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात आले. यासाठी या समितीची अंतिम बैठक नुकतीच (दि. ०४ जुलै) पुणे येथे पार पडली असून त्यामध्ये ठरविण्यात आलेल्या नावांस मान्यतेसाठी शिफारस राज्य जैवविविधता मंडळाकडे करण्यात आली असून मंडळाच्या बैठकीत या यादीस मान्यता मिळू शकेल अशी माहिती मंडळाचे सदस्य तथा समिती सदस्य डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

फुलपाखरांची मराठी नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, सवय, दिनक्रम, आवडीनिवडी, दिनक्रम, खाद्य वनस्पती, तसेच आवश्यक तेथे इंग्रजी नावांचे भाषांतर, संस्कृत भाषा व पौराणिक ऐतिहासिक संदर्भ, ई निकषांचा विचार करून नावावरून फुलपाखरू ओळखता यावे तसेच उच्चारण्यास सोपे, सहज तोंडी बसेल, व काही ठिकाणी बोलीभाषेतील शब्दांचा वापर करून ही नावे ठरविण्यात आली आहेत. यापूर्वी डॉ. संजीव नलावडे, डॉ. राजू कसंबे यांचे पुस्तकात आलेली आणि काही प्रचलित असलेल्या नावांचा सुद्धा यावेळी विचार करण्यात आला. यादीस मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता प्राप्त झाल्यानंतर या नावाच्या प्रचार व प्रसार करून सर्वमान्य होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येतील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी दिली.

दिलेल्या नावांमध्ये नीलायम, निलपर्ण, भोंडी, नीलरेखा, भीमपंखी, बहुरूपी, सोंगाड्या, भटक्या, गोलू, मदालसा, पट्टमयूर, ढवळ्या, पवळ्या, भिरभिरी, हबशी, केशरटोक्या, शेंदूरटोक्या, नीलाम्रुद, नीलबाभळी, अशोकासक्त, रत्नमाला, झिंगोरी, तरूछाया, तरंग, झुडपी हुप्या, ताडपिंगा, रुईकर अशा नावांचा समावेश आहे. फुलपाखरांच्या सहा कुळांना सुद्धा नावे देण्यात आलीत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र