शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारी कार्यालयांतही आता मराठी भाषेची सक्ती; त्रिभाषा सूत्राची काटेकोर अंमलबजावणी

By यदू जोशी | Updated: November 1, 2020 06:08 IST

Marathi language is now compulsory even in central government offices : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी, इंग्रजी आणि संबंधित राज्याची राज्यभाषा यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात हिंदी, इंग्रजीबरोबरच मराठीचाही समान वापर करणे अपेक्षित आहे.

- यदु जोशी

मुंबई : राज्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर आता राज्यातील केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या वापराची सक्ती केली जाणार आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी, इंग्रजी आणि संबंधित राज्याची राज्यभाषा यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात हिंदी, इंग्रजीबरोबरच मराठीचाही समान वापर करणे अपेक्षित आहे. मात्र, असे निदर्शनास आले आहे की, मराठीचा वापर अगदी नगण्य किंवा दाखविण्यासाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर, त्रिभाषा सूत्राची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्याची भूमिका मराठी भाषा विभागाने घेतली आहे. ही अंमलबजावणी कशी असेल, यासंबंधीचा प्रस्ताव मराठी भाषा विभागाने तयार केला असून तो राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे पाठविला आहे. मुख्य सचिवांनी पुढील आठवड्यात यासंबंधात बैठक बोलावली आहे. 

सुभाष देसाई यांचे अमित शहांना पत्र त्रिभाषा सूत्राची केंद्रीय कार्यालयांमध्ये कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले होते. उत्तरात त्यांनी तशी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता केंद्र याबाबत कुठली पावले उचलणार याबाबत उत्सुकता आहे. 

कर्नाटकातील ‘ती’ स्थगिती, महाराष्ट्र काय भूमिका घेणार?मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण मंजुरीच्या नियमावलीवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या. त्यासाठी हिंदी व इंग्रजी भाषेतून एक अधिसूचना काढली. ती कानडी भाषेत काढली नाही, या मुद्द्यावर एका व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय ओक यांनी अधिसूचनेला स्थगिती दिली. या धर्तीवर केंद्राकडून येणारी प्रत्येक अधिसूचना मराठीतही असावी, असा आग्रह महाराष्ट्र केंद्राकडे धरणार का, हा प्रश्न आहे.

केंद्र सरकारी कार्यालये, उपक्रम, बँका, अन्य वित्तीय संस्था, रेल्वे खात्यात मराठीच्या वापराबाबत उदासीनता आहे. बँकेतील विविध सूचना, पावत्या या इंग्रजी व हिंदीतच असतात. रेल्वेच्या उद्घोषणा मराठीतूनही होतात, पण आरक्षणाचे फॉर्म मराठीत नसतात. केंद्र सरकारी कार्यालयांमधून मराठी जवळपास हद्दपार झाली आहे. 

त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर नियमाने कसा अनिवार्य आहे, याचा फलकच आता मुंबईतील प्रत्येक केंद्र सरकारी आस्थापनांच्या कार्यालयांसमोर राज्य शासनाकडून लावण्यात येईल. तसेच मराठीचा वापर न करणाऱ्या आस्थापनांना नियमांचे भान आणून द्यावेच लागेल.     - सुभाष देसाई,     मराठी भाषा विभाग मंत्री

टॅग्स :marathiमराठीSubhash Desaiसुभाष देसाई