शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Marathi Bhasha Din : भाषाविषयक समज परिपक्व व्हावी म्हणून....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:13 IST

Marathi Bhasha Din: दहावी बारावीची, मराठीची उत्तरपत्रिका तपासताना आणि पुढे त्याला उत्तम गुण मिळाल्यानंतर तो जेव्हा प्रवेश अर्ज लिहितो ,त्यावेळी त्याचे लेखन तपासताना,  वाचताना या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते. विद्यार्थ्यांची भाषाविषयक समज तोकडी का असते याची अनेक कारणे आहेत., ती अशी...

- डॉ. नागेश अंकुश (भाषा अभ्यासक व उपक्रमशील शिक्षक, श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.९४०४२८८७६६) मराठीत उत्तम गुण असणं आणि मातृभाषेबद्दल   समज चांगली असणे या दोन बाबी पूर्णतः भिन्न आहेत., याची जाणीव विद्यार्थ्यांचा मराठी लेखन वाचताना तीव्रतेने होते. दहावी बारावीची, मराठीची उत्तरपत्रिका तपासताना आणि पुढे त्याला उत्तम गुण मिळाल्यानंतर तो जेव्हा प्रवेश अर्ज लिहितो ,त्यावेळी त्याचे लेखन तपासताना,  वाचताना या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते. विद्यार्थ्यांची भाषाविषयक समज तोकडी का असते याची अनेक कारणे आहेत., ती अशी... त्यांना मराठी मुख्य भाषा , विषय वाटत नाही. प्राथमिक स्तरांमध्ये या भाषेची गोडी त्यांना लागत नाही. शिक्षक म्हणून आपण भाषा शिकवण्यापेक्षा भाषेमधूनच शिकवण याला अधिक प्राधान्य देतो म्हणून. अशी अनेक कारणे सांगता येऊ शकतील. अभ्यासक्रमाच्या शालेय आणि महाविद्यालयीन चौकटीत  भाषाविषयक कौशल्यांना  त्यांना मुख्य प्राधान्य असायला हवे, तरच विद्यार्थ्यांची भाषाविषयक समज अधिक दृढ होऊ शकेल. बहुतेक विद्यार्थ्यांना आज भाषेत स्वतंत्रपणे लिहिता येत नाही हे वास्तव आहे, विद्यार्थी निबंधाच्या पाच प्रकारांमध्ये वैचारिक निबंध फार कमी प्रमाणात लिहितात. त्यासाठी अवांतर वाचन लागते म्हणून कदाचित विद्यार्थी हा या विषयाकडे वळतो नसावेत. साधा प्रवेश अर्ज आवेदन पत्र असे प्राथमिक स्तरातील लेखनात  विद्यार्थी कमालीचे दुर्लक्ष करताना पदोपदी जाणवतं. कित्येकदा असं घडतं की विद्यार्थ्यांना मराठीत उत्तम गुण असूनही विद्यार्थ्यांनी भाषाकौशल्य नीटपणे आत्मसात केलेलीच नसतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण भाषा कशी शिकतो, कशी बोलतो भाषा कशी बोलली जाते कशी लिहिली जाते ,आपण भाषा कशी ऐकतो, आशय परिणामकारक रीतीने कसा लिहावा, अचूक कसा लिहावा, अशा कौशल्यांसाठी वर्षभरात विविध उपक्रमांची आखणी करणे गरजेचे आहे. याची सुरुवात मुलांनी कसं ऐकावं इथपासून करता येऊ शकेल, त्यासाठी दूरदर्शनच्या, आकाशवाणीच्या बातम्या उद्घोषणा कार्यक्रम मुलांनी ऐकावे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देता येऊ शकेल .अर्थ समजून घेत कसं वाचावं हेही त्यांना शिकवावे लागेल.

कोरोनामुळे तर ही एकाग्रता अधिक कमकुवत झाल्याचे दिसून येतं, अशा पार्श्वभूमीवर मुलांना मानसिक विकसित करणं हे आपण आहे ते भाषा शिक्षकांनी सहजपणे पेलावे लागेल. भाषा शिक्षकास मुलांना वेगवेगळ्या वेळी बोलतं करू शकतात बोलत करतात, आपल्या चाकोरीबाहेरच्या अनेक विषय देऊन त्यांना बोलतं करता येऊ शकतं, म्हणूनच अलीकडे कृती पत्रिकेमध्ये स्वमत यासंदर्भात प्रश्न आढळून येतात. मुलांच्या बोलण्यातील संभ्रमा प्रमाणे गोंधळ प्रमाणे अर्ज तरी असा संभ्रम आणि गोंधळ दिसून येतो नेमकेपणा चा अभाव असतो कर्जतला पत्रक लहान नेमकेपणा भाषा शिक्षक म्हणून आपल्याला मुलांमध्ये नेमकेपणाने रुजवत येऊ शकेल. आणि या भाषाविषयक कौशल्य बरोबरच अवांतर वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येऊ शकेल.

बहुतेक विद्यार्थी क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे डोकावत नाहीत, अलीकडे स्क्रीनच्या अतिवापरामुळे हे आव्हान वाढला आहे. वाढते आहे. यासाठी वर्णन पर निबंधाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येऊ शकेल. विद्यार्थ्यांच्या भावविश्वात अनेक अनुभव असतात त्या अनुभवांच्या प्रगती करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवता येऊ शकतात. यातूनही भाषाविषयक कौशल्यांची रुजवण होऊ शकते. असे निरंतर प्रयत्न झाले तरच विद्यार्थी उस्फूर्तपणे, आणि परिणामकारकतेने लिहू शकतात.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनmarathiमराठी