शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:00 IST

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे.

ठळक मुद्दे'' अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ'' संस्थेचा असणार सहभाग  हा कार्यक्रम ४ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅन अबॉर ,मिशीगन येथे होणारअमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतील व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार भारत व अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ व प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात येणार

पुणे : काही दिवसांपासून भारतअमेरिका यांचे संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. परंतु, दोन्ही राष्ट्रांमधील बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय असोसिएशनला सहभाग नोंदविण्याची संधी प्राप्त होत आहे अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ (ए२एमएस ) अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतील व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. भारत व अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ व प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात येणार आहे.    अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ ही २००६ मध्ये स्थापना झालेली संस्था अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अर्थातच अ‍ॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे.

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे. हा कार्यक्रम ४ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅन अबॉर ,मिशीगन येथे होणार आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान करुन भारतीय नागरिक परेडमध्ये दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम दर्शन घडविणार आहे. जवळपास १०० भारतीय नागरिक या परेडसाठी अतोनात परिश्रम घेत आहेत व ही परेड यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.    काही दिवसांपूर्वी भारताच्या आर्थिक धोरणांवर नाराजी व्यक्त करतानाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, अमेरिकेत तयार होणारी एक प्रख्यात मोटारसायकल भारतात येते तेव्हा तिच्यावर शंभर टक्क्यांएवढे आयात शुल्क पूर्वी लावले जायचे. त्या
मुळे ती भारतीयांना दुप्पट भावाने विकत घ्यावी लागायची आणि अमेरिकेचा व्यापार घटून भारताच्या तिजोरीत मोठी भर पडायची. ही विषमता नाहीशी करण्याचा इशारा अमेरिकेने प्रथम दिला तेव्हा भारताने ते शुल्क ५० टक्क्यांवर आणले. पण अमेरिकेला तेही मान्य नाही. आम्ही तुमच्या मालावर आयात शुल्क लावत नाही म्हणून तुम्हीही ते लावायला नको, असे तिचे म्हणणे आहे व ते करणार नसाल तर आम्हालाही आवश्यक ती कारवाई करावी लागेल,असे ट्रम्प यांचे सांगणे आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका व भारत यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. परंतु, या बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बाब म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय असोसिएशनला सहभाग नोंदविण्याची संधी प्राप्त होत आहे.   ए२एमएएसचे संस्थापक संचालक भूषण कुलकर्णी म्हणाले, अ‍ॅन आर्बर मराठी मंडळ हे अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे अ‍ॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान करुन भारतीय नागरिक परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम पाहण्याची संधी मिळणार आहे.
ही संस्था भारतीय मूळ असलेल्या लोकांनी, मराठी संस्कृती वृध्दिंगत व्हावी यासाठी स्थापन केली. भारतापासून दूर असूनही चालीरिती , सण , उत्सव , भाषा यांची नव्याने ओळख नव्या पिढील व्हावी . मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर पडावी त्यांचे व नातलगांची स्वागतच व्हावे सर्वांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी असे कार्यक्रम करणए ही सर्व संस्थेची उदिद्ष्टे आहेत. ए२एमएस ने २०१४ मध्ये एक मराठी शाळा सुरु केली. ज्याला मिशीगन शिक्षण विभागाकडून सील ऑफ बायलीटरसी मिळाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी