एका क्लिकवर बघायला मिळणार मराठी सांस्कृतिक मैफिली
By Admin | Updated: October 25, 2016 16:05 IST2016-10-25T16:03:55+5:302016-10-25T16:05:38+5:30
सध्या इंटरनेटवर हव्या त्या गोष्टी अगदी सहज आणि एका क्लिकवर उपलब्ध असतात. तरी काही कंटेंट शोधण्यासाठी फार आटापिटा करावा लागतो

एका क्लिकवर बघायला मिळणार मराठी सांस्कृतिक मैफिली
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - सध्या इंटरनेटवर हव्या त्या गोष्टी अगदी सहज आणि एका क्लिकवर उपलब्ध असतात. तरी काही कंटेंट शोधण्यासाठी फार आटापिटा करावा लागतो तरी मनासारखं काही मिळत नाही. यापैकीच एक म्हणजे सांस्कृतिक संगीत, कितीही गुगलींग केलं तरी पाहिजे ते काही मिळत नाही, मात्र मराठी संगित रसिकांची ही अडचण आता दूर होणार आहे.
महाराष्ट्रात संगीताच्या खूप पुरातन प्रथा आहेत. त्यातील आभिजनात प्रचलित असलेला प्रकार म्हणजे शास्त्रीय संगीत जे शिकायला आणि समजायला विशिष्ठ बौध्दिक आणि मानसिक पात्रता लागते. अपारंपारिक पण ठोस परंपरा निर्माण केलेले संगीत प्रांतोप्रांती आपला ठसा लोकमानसावर कायम करून बहरले आहे. महाराष्ट्रात अभंग लोकसंगीताचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. बंगालात बाऊलसंगीत वातावरण भारून टाकतं, पंजाबात सिंधमध्ये नृत्य गायनाचे जलसे लोकांच्या मनावर गारुड करीत असतात.
अशाच प्रकारे महाराष्ट्रात होणारे सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रम रसिकांना घरबसल्या अनुभवायचा आनंद मिळणार आहे. आदित्य ओक नावाच्या एका मराठी तरूणाने आणि त्याच्या सहका-यांनी www.kalastream.com नावाची वेबसाइट सुरू केली आहे. महाराष्ट्रात होणारे निवडक आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व्हिडीओ क्वालिटीसह या साइटवर उपलब्ध असणार आहे. ही साइट जगभरातील रसिकांना जोडणारा सांस्कृतिक दुवा ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.