शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत", प्रसाद लाड यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:56 IST

Prasad Lad : एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते. 

मुंबई :  दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते. 

"ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणारं प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे, म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असे प्रसाद लाड म्हणाले. 

याचबरोबर, "मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु", असे म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.   

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती एकमेकांकडून आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, असे आव्हान राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले. तसेच, मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, असा आरोपही राजेंद्र राऊत यांनी केला होता. दरम्यान, राजेंद्र राऊत यांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी राजगादीचा किती आदर करतो, हे उदयन महाराजांना माहिती आहे. तुम्ही मराठ्यांचे तुकडे पाडायला बसलात, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शिवाय, राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण