शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:44 IST

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५ व २६ जुलै आणि ९ आॅगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५ व २६ जुलै आणि ९ आॅगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले आहेत. यासंदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात त्यांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी हे आदेश दिल्याची माहिती समन्वयक अनिल शिंदे यांनी दिली.शिंदे म्हणाले की, आंदोलनादरम्यान बहुतेक निरपराध आंदोलकांवर दंगल करणे, जाळपोळ करणे, पोलिसांवर हल्ले करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यासंबंधात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या वेळी मराठा समाजाच्या शिष्टमंडळात विजय भोसले, प्रफुल्ल पवार, अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, डॉ. सुभाष कदम, दशरथ पाटील, स्वप्निल काटकर, विलास सुद्रीक व संदीप सावंत यांनी आंदोलकांची बाजू मांडली. या बैठकीत गृहखात्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), आणि विधि व न्याय विभागाचे वकील उपस्थित होते. केसरकर यांनी या वेळी मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या तत्त्वत: मान्य करून त्यासंदर्भात गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.जे गुन्हे आम्ही केले नाहीत ते गुन्हे आमच्यावर दाखल करून आम्हा तरुणांवर गुन्हे कबूल करण्यासंदर्भात दबाव आणणे चुकीचे असल्याचे म्हणणे शिष्टमंडळातर्फे मांडण्यात आले. चौकशीअंती असे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. कोपरखैरणे येथे झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या रोहन तोडकर या मराठा तरुणाच्या मृत्यूच्या चौकशीचे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा