मराठा समाजाला फसवण्याचा भाजपचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 05:16 IST2016-10-03T05:16:14+5:302016-10-03T05:16:14+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Maratha society to betray the BJP! | मराठा समाजाला फसवण्याचा भाजपचा डाव!

मराठा समाजाला फसवण्याचा भाजपचा डाव!


मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चर्चेतून सरकार मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे नेतृत्त्व म्हणून भाजप महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांना पुढे करत आहे. मात्र याआधी धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्ट रोजी निघालेल्या मोर्चाला पाटील यांनी चर्चेचे आवाहन केले. मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रश्नावर साधी चर्चा करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोणताही निर्णय न घेता केवळ चर्चेचे आवाहन करून धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाची फसवणूक करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाला आरक्षणासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तरी अ‍ॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात मराठा आणि दलित नेत्यांसोबत चर्चा करूनच कोणताही निर्णय घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Maratha society to betray the BJP!