शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मी आणि दरेकर राजीनामा देतो, पण...; प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 14:48 IST

मराठा आरक्षणावरून सातत्याने सरकारवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

पुणे - सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली. गोरगरिब कुटुंबाला महिन्याला दीड ते ३ हजार मिळत असतील तर त्याला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला पाहिजे, विरोधकांच्या छत्रीखाली जाऊन टीका करू नये. मनोज जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये. विरोधकाची भूमिका घेऊ नये. जर त्यांना राजकारण करायचं असेल मी आणि प्रविण दरेकर राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या असं आवाहन प्रसाद लाड यांनी केले आहे. 

प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगेनी राजकारणात यावं, आमदार व्हावं आणि एका सहकाऱ्याला सोबत घेत आमदार करावं. विधान परिषदेत त्यांची भूमिका मांडावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही आणि सत्ताधाऱ्यांवर  टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणासाठी आम्ही नक्कीच तुमच्यामागे आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच काही मागण्या या न्यायिक बंधनात असतात. राज्य चालवताना १४ कोटी जनतेचं राज्य चालवायचं असतं. त्यात सर्व समाज असतो ते मायबाप असतात. मग मराठा, ओबीसी, अल्पसंख्याक इतर समाज हे मायबाप आहेत. जेव्हा सर्वपक्षीय बैठक लावली तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आले नाही. मग या बैठकीस हे नेते का आले नाही हा प्रश्न जरांगे पाटील का विचारत नाही असा सवालही प्रसाद लाड यांनी केला. 

दरम्यान, मी पुढाकार घेतो, मुख्यमंत्री, मनोज जरांगे पाटील, शरद पवार  आणि त्यांना हव्या त्या नेतृत्वाच्या उपस्थितीत इन कॅमेरा बैठक घेऊ. मीडियाला आमंत्रित करतो. सर्व संपादकांना बोलावू. २०१७ मधील जे नोटिफिकेशन आहे त्यात सगेसोयरेंचाही उल्लेख आहे. त्यामुळे एकदा जरांगे पाटील यांनी चर्चेला यावं. मला कुणाला लपून भेटायची सवय नाही. मी मराठा आहे. अंगावर आलं तर शिंगावर घेतो. मी मनोज जरांगेंचा आदर करतो. मला अनेक धमक्यांचे फोन आले परंतु मी तक्रार करत नाही. कदाचित जरांगेंना कुणीतरी चुकीचं सांगतंय असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला. 

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारBJPभाजपा