शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड हिंसाचारामागे १० गट, २६२ जण अटकेत; पोलीस अधीक्षकांनी सगळेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:49 IST

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली.

बीड - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता. या घटनेला १ महिना पूर्ण होत असून यात आतापर्यंत २६२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात बीडमध्ये जाळपोळ, तोडफोड करणारे एकूण १० गट असल्याचं आढळले. त्यातील ६ गटाचे प्रमुख पकडले गेलेत. इतर ४ गटांचे प्रमुख पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.गटातील इतर सदस्यांना अटक केली आहे. महत्त्वाच्या आरोपींपैकी पप्पू शिंदे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

नंदकुमार ठाकूर म्हणाले की, पप्पू शिंदेकडे चौकशी सुरू असून त्यानेदेखील काही नावे सांगितली आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. कायदेशीरपणे निष्पक्षपाती या घटनेचा संपूर्ण तपास होत आहे. ही घटना गंभीर असून त्याचे गांभीर्य ओळखूनच पोलीस तपास करत आहे. यात कुठल्याही प्रकारे दबाव घेणार नाही. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत त्यांना मुभा देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. तपास अंमलदार या घटनेत योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पप्पू शिंदे हा बीडमधील सर्वच घटनांमध्ये असल्याचे निष्पन्न झाला आहे. त्याने या घटनेसाठी मुलं गोळा करण्याचे काम केले. पप्पू शिंदेने शुभम ज्वेलर्स इथं सुरुवात करून जमावनिर्मिती केली. त्यामुळे तो या घटनेत महत्त्वाचा आरोपी आहे. पप्पू शिंदे याच्यावर शुभम ज्वेलर्सला धमकावणे, सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकणे यासारख्या गोष्टींसाठी तो जबाबदार आहे. बीड हिंसाचारातील घटनांमध्ये पप्पू शिंदे हा सर्वात महत्त्वाचा आरोपी आहे असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं. 

काय आहे प्रकरण?मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या हिंसक आंदोलनात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींच्या घरांना, कार्यालयांनाही टार्गेट करण्यात आले. त्याचसोबत शासकीय इमारतीही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादी भवनही जाळले होते. या जाळपोळीत, संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळुंखे यांच्या घराचाही समावेश आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस