शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत...", मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्‍गार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 12:32 IST

Maratha Reservation : ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

Maratha Reservation : (Marathi News) राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून  मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होवू, यासाठी अनेक ट्रॅप लावले गेले, पण आम्ही ते उधळून लावले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सतत बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं, असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाही आहे. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलत आहेत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत, तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारणमध्ये घुसायला लागले आहेत. ७० ते ७५ वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय, ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारच्या निर्णयाचा ६० लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे. काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत. त्यांना आवाहन आहे की श्रेय घेऊ नका, हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे. सगेसोयरेबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं. मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. कायद्यात बदल करताना अधिसूचना काढव्या लागतात आणि सरकारने काढल्या. येत्या १५ फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे. त्यामुळे मुंबईत मराठे गेले आणि आरक्षण घेऊन आले, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. 

या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या १० तारखेला बेमुदत उपोषण करणार आहे, जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण