शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी

By यदू जोशी | Updated: November 20, 2018 05:52 IST

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही.

मुंबई : मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीवर हा निर्णय सोपविला असला तरी टक्के ठरविताना फडणवीस सरकारचा कस लागणार आहे.मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी त्यात तथ्य नसल्याचे सरकारी सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. १६ टक्के आरक्षणाच्या वृत्तामुळे समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यापेक्षा कमी आरक्षण दिल्यास अपेक्षा पूर्ण न झाल्याने आमच्याविषयी नाराजीच राहील, अशी भीती एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केली.टक्क्यांवरून भाजपा-शिवसेनेच्या मराठा व ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. सर्वच पक्षांच्या ओबीसी आमदारांचा १६ टक्के आरक्षणास आक्षेप आहे. काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते व्यक्त केले. मराठा लोकसंख्या ३२ टक्के असल्याचे सांगितले असून, त्यात कुणबीही आहेत का, मराठा लोकसंख्या किती आहे हे पाहून आरक्षण द्यावे, असे ओबीसी आमदारांचे म्हणणे आहे.भाजपा व काँग्रेसच्या चार आमदारांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली. मराठा लोकसंख्येबाबत विविध समित्या, संस्थांच्या अहवालात वेगवेगळी माहिती आहे. ओबीसींना १९ टक्के आरक्षण असून, त्यात कुणबी, माळी व तेलींसह २४७ जातींचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, ओबीसींच्या १९ टक्क्याला धक्का न लावता मराठा समाजाला त्यात वाढीव आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. स्वतंत्र प्रवर्गात आघाडी सरकारने आरक्षण दिले. पण ते न्यायालयात टिकले नाही. हे आरक्षण ओबीसींमध्ये दिले तरच ते टिकेल, असे ते म्हणाले.व्होट बँकेला दुखवायचे नाहीओबीसी ही भाजपाची व्होट बँक आहे. मराठा समाजाला ओबीसींअंतर्गत आरक्षण दिल्यास ही व्होट बँक दुरावेल, अशी भीती भाजपाला आहे. त्यामुळे वेगळ्या सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्गात आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे मराठा समाजास १६ टक्के आरक्षण मिळेल, असे वाटत नाही, असे ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र