शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन; १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 08:41 IST

Maratha Reservation : कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली.

कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिले आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमितून म्हणजेच कोल्हापुरातून १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला, आता आक्रमकता काय असते ती दाखवू, असा गर्भित इशाराही गुरुवारी दिला. 

कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली. त्यानंतर संभाजीराजे यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नुसती पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा. आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार, ते ठोसपणे सांगा, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड जिल्ह्यातही मूक आंदोलने होतील. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर एकदाच जोर लावला जाईल. पुण्यातून  थेट मंत्रालयावर लाॅगमार्च काढला जाईल आणि त्यात महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोपार्डीत १२ जूनला अभिवादनसकल मराठा समाजाच्या आंदोलनात जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कोपार्डीतील समाधीला १२ जून रोजी खासदार संभाजीराजे भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. 

मूक आंदोलनानंतर ‘लाॅगमार्च’ ची तारीख जाहीर करणारपहिल्या टप्प्यात कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलने होतील. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जायचे, हे समन्वयक ठरवतील. पुढे प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयकांशी चर्चा करून लॉग मार्चची तारीख निश्चित केली जाईल. सगळ्या ३६ जिल्ह्यांतील मराठा समाजाला पुण्यात आणून तेथून थेट मंत्रालयावर लॉगमार्चची सुरुवात होईल, असे संभाजीराजे म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर