शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक, राज्य सरकारला दिला गंभीर इशारा

By बाळकृष्ण परब | Updated: October 7, 2020 18:36 IST

Maratha Reservation News : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय

ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक मांडली भूमिका मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नाही आहे एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल

नवी मुंबई - आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.मराठा आरक्षण परिषदेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय, असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. दरम्यान,  मी मराठा समाजाचा नेता नाही तर सेवकमी समाजाचा नेता नाही, तर सेवक आहे' अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून समाजाच्या सोबतच बसेन, अशी भूमिका घेऊन बैठकीत सहभागी झालो आहे, असे सांगत संभाजीराजे या बैठकीत सहभागी झाले होते.  

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे. या विषयाबाबत राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याही त्यांनी केलेल्या नाहीत. राज्य सरकारने सारथी संस्था बुडवली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा राज्य सरकारने खेळखंडोबा केला. सरकार मराठा समाजासोबत किती काळ खेळणार आहे. एमपीएससीमधून ४२७ विद्यार्थी पास झाले. त्यातील १२७ मराठा समाजातील आहेत. त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल त्यांनी केला.एमपीएससीची परीक्षा परीक्षा होऊ नयेत अशी मराठा समाजाची भावना आहे. मात्र तरीही सरकार परीक्षा देण्याची घाई का करत आहे, असा सवाल विचारत सरकारने ऐकले नाही तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घ्यावा. असा इशारा संभाजीराजेंनी दिला.उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठदरम्यान, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaharashtraमहाराष्ट्र