शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: ...तर आरक्षण एक दिवसही टिकणार नाही- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 17:21 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हीच निकाली काढणार आहोत.

मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हीच निकाली काढणार आहोत. आयोगाच्या अध्यक्षांनी आपलं काम सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा आमच्या सरकारनं केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईतल्या राजाराम महाराजांच्या कार्यक्रमात बोलत होते. काही लोक म्हणतात अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, पण तसं केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण हेच सरकार देणार आहे. ज्या लोकांना हे कळतं ते आज बोलू शकत नाहीत, कारण ते दडपणात आहेत, पण ज्यांना हे कळत नाही त्यांना निश्चित भविष्यात हे कळेल की आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र कोर्टाने त्याला स्थगिती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र स्वातंत्र्योत्तर काळात ते निघून गेलं, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.  शिवस्मारकाच्या उंचीवरून केलेलं राजकारण दुर्दैवी आहे. शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक हे सर्वात उंच स्मारक असेल, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराजांमुळे कोल्हापूर शेतीत समृद्ध झाली आहे. राजाराम महाराजांनी प्रत्येक गावात शाळा असावी, असा आग्रही विचार केला, शिक्षणासाठी दुपटीने तरतूद केली. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी विमानतळ निर्मितीचा विचार राजाराम महाराजांनी पहिल्यांदा मांडला. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ, शाश्वत शेतीचा विचार, औद्योगिकीकरणाची सुरुवात राजाराम महाराजांनी विसाव्या शतकात केली, राजाराम महाराजांनीच आधुनिक भारताचा मंत्र दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून सांगितलं आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण