शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 09:19 IST

राज्य शासनाचे एमपीएससीला पत्र; परीक्षा शुल्काची सवलत कायम

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) या आधी झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी असलेली ४३ वर्षे ही कमाल वयोमर्यादा ही या उमेदवारांचा खुल्या प्रवर्गातील भरतीसाठी विचार करताना कायम ठेवावी, असे राज्य शासनाने एमपीएससीला कळविले आहे.

एमपीएसीने विविध मुद्यांवर राज्य शासनाचा सल्ला मागितला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने एमपीएससीने हा सल्ला मागितला होता.  मागासवर्गीय उमेदवारांना देय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीचा फायदा घेऊन मूळ परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) उमेदवारांबाबत काय भूमिका घ्यायची अशी विचारणा एमपीएससीने केली होती. त्यावर, शासनाने स्पष्ट केले की, एसईबीसी उमेदवारांचा खुल्या प्रवर्गात विचार करताना एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अराखीव पदाकरता असलेली वयोमर्यादा ओलांडली असेल तर मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवावी. 

एमपीएससीची विचारणाnस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊन मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तथापि, अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, त्या बाबत काय?nएसईबीसी मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तथापि मुलाखती प्रलंबित आहेत.nसरळसेवा भरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परंतु मुलाखती प्रलंबित आहेत, त्याचे काय करावे?nस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तथापि, शारीरिक चाचणी प्रलंबित आहे,त्या बाबत काय?nस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तथापि, मुख्य परीक्षा प्रलंबित आहे, त्यावर काय करावे?nएसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांच्या आधारे पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत. तथापि, पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.nएसईबीसी आरक्षणाच्या आधारे स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीसाठी अद्याप पूर्वपरीक्षेचे आयोजन झालेले नाही, त्याबाबत काय?

राज्य शासनाने काय कळविले?nअशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रूपांतरित करून मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करून केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात. अपात्र उमेदवारांना वगळण्यात यावे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पर्याय घेऊन त्यांच्या पर्यायानुसार ईडब्ल्ययूएस अथवा खुल्या प्रवर्गातून नियुक्तीची शिफारस करावी.nएमपीएससीने वरील सुधारित नियमांप्रमाणे कार्यवाही करावी. त्यानुसार एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करुन मुलाखती घ्याव्यात. nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन चाळणी परीक्षेचा निकाल सुधारित करावा. त्यानंतर मुलाखती घ्याव्यात.nएसईबीसी प्रवर्गासाठी राखी असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या अथवा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करावा व सुधारित निकालानुसार शारीरिक चाचणी घ्यावी.nअशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएसमध्ये रुपांतरित करून, एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन पूर्वपरीक्षेचा निकाल सुधारित करून मुख्य परीक्षा घ्यावी.nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस मध्ये रुपांतरित करून एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन निकाल जाहीर करा.nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव पदे ही खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या अथवा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन पूर्वपरीक्षा घ्यावी.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMPSC examएमपीएससी परीक्षा