MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:18 AM2021-06-13T09:18:51+5:302021-06-13T09:19:21+5:30

राज्य शासनाचे एमपीएससीला पत्र; परीक्षा शुल्काची सवलत कायम

Maratha reservation! In the previous recruitment process, the age limit of Maratha candidates remained the same in MPSC | MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम

MPSC: मराठा आरक्षण! आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम

googlenewsNext

- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) या आधी झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी असलेली ४३ वर्षे ही कमाल वयोमर्यादा ही या उमेदवारांचा खुल्या प्रवर्गातील भरतीसाठी विचार करताना कायम ठेवावी, असे राज्य शासनाने एमपीएससीला कळविले आहे.

एमपीएसीने विविध मुद्यांवर राज्य शासनाचा सल्ला मागितला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने एमपीएससीने हा सल्ला मागितला होता.  मागासवर्गीय उमेदवारांना देय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीचा फायदा घेऊन मूळ परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) उमेदवारांबाबत काय भूमिका घ्यायची अशी विचारणा एमपीएससीने केली होती. त्यावर, शासनाने स्पष्ट केले की, एसईबीसी उमेदवारांचा खुल्या प्रवर्गात विचार करताना एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अराखीव पदाकरता असलेली वयोमर्यादा ओलांडली असेल तर मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवावी. 

एमपीएससीची विचारणा
nस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊन मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तथापि, अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, त्या बाबत काय?
nएसईबीसी मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तथापि मुलाखती प्रलंबित आहेत.
nसरळसेवा भरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परंतु मुलाखती प्रलंबित आहेत, त्याचे काय करावे?
nस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तथापि, शारीरिक चाचणी प्रलंबित आहे,त्या बाबत काय?
nस्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आधारे पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तथापि, मुख्य परीक्षा प्रलंबित आहे, त्यावर काय करावे?
nएसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांच्या आधारे पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत. तथापि, पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
nएसईबीसी आरक्षणाच्या आधारे स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीसाठी अद्याप पूर्वपरीक्षेचे आयोजन झालेले नाही, त्याबाबत काय?

राज्य शासनाने काय कळविले?
nअशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रूपांतरित करून मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करून केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात. अपात्र उमेदवारांना वगळण्यात यावे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पर्याय घेऊन त्यांच्या पर्यायानुसार ईडब्ल्ययूएस अथवा खुल्या प्रवर्गातून नियुक्तीची शिफारस करावी.
nएमपीएससीने वरील सुधारित नियमांप्रमाणे कार्यवाही करावी. त्यानुसार एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करुन 
मुलाखती घ्याव्यात. 
nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन चाळणी परीक्षेचा निकाल सुधारित करावा. त्यानंतर मुलाखती घ्याव्यात.
nएसईबीसी प्रवर्गासाठी राखी असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या अथवा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करावा व सुधारित निकालानुसार शारीरिक चाचणी घ्यावी.
nअशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या व ईडब्ल्ययूएसमध्ये रुपांतरित करून, एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन पूर्वपरीक्षेचा निकाल सुधारित करून मुख्य परीक्षा घ्यावी.
nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव पदे खुल्या व ईडब्ल्ययूएस मध्ये रुपांतरित करून एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुुल्या वा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन निकाल जाहीर करा.
nएसईबीसी प्रवर्गासाठी राखीव पदे ही खुल्या व ईडब्ल्ययूएस प्रवर्गात रुपांतरित करून व एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या अथवा ईडब्ल्ययूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन पूर्वपरीक्षा घ्यावी.

Web Title: Maratha reservation! In the previous recruitment process, the age limit of Maratha candidates remained the same in MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.